ETV Bharat / bharat

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सचिवालय निर्जंतुकीकरणासाठी बंद

रविवारी येथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून या "तीन मजली दगड इमारतीच्या पहिल्या मजल्याची निर्जंतुकीकरण करण्याकरता हे प्रशस्त सचिवालय आंशिक काळाकरता ठेवण्यात आले आहे.

कर्नाटक सचिवालय
कर्नाटक सचिवालय
author img

By

Published : Jul 6, 2020, 4:01 PM IST

बंगळुरू : देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंमुळे दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. यातच कर्नाटक सचिवालयाची प्रशस्त ‘विधान सौध’ ही इमारत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्याकरता आंशिक काळासाठी बंद करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानी सोमवारी दिली.

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले, रविवारी येथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून या "तीन मजली दगड इमारतीच्या पहिल्या मजल्याची निर्जंतुकीकरण करण्याकरता हे प्रशस्त सचिवालय आंशिक काळाकरता बंद ठेवण्यात आले आहे. तर, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, 50 वर्षांपेक्षा जास्त व सर्व सचिवालय इमारतीत कार्यरत असलेल्या सर्व सरकारी कर्मचार्‍यांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, इतरांनाही लंचच्या सुट्टीनंतर कर्तव्याची माहिती देण्यास सांगण्यात आले. तर, शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागिराकांच्या भेट देण्याच्या 3:30-5:30 या वेळेतील एक तास कमी करत 4:30-5:30 ही वेळ ठरवण्यात आली आहे.

विधान सौदा भवनला लागून असलेले राज्याचे मिनी सचिवालय विकास सौध या इमारतीमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर, या इमारतीलादेखील १९ जून रोजी निर्जंतुकीकरण करण्याकरता बंद करण्यात आले होते. राज्य सरकारने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना या महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या व चौथ्या शनिवारी दोन ऑगस्टपर्यंत सर्व लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी १ हजार ९२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील 1,235 रुग्ण हे बंगळुरुचे आहेत. तर, आतापर्यंत बंगळुरु शहरात ९ हजार ५८० बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून ८ हजार १६७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे राज्य आरोग्याने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.