ETV Bharat / bharat

'सर्व खबरदारीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरू करणार' - नितीन गडकरी

बस आणि कारचा वापर करताना सोशल डिस्टन्स ठेवणे, सतत हात धूत राहणे, फेस मास्क वापरणे यासारख्या सुरक्षेच्या बाबी पाळणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

'सर्व खबरदारीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरू करणार'

author img

By

Published : May 6, 2020, 11:14 PM IST

नवी दिल्ली - कोरोना संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र, लवकरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळले जातील, असेही ते म्हणाले. बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबत आज गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

बस आणि कारचा वापर करताना सोशल डिस्टन्स ठेवणे, सतत हात धूत राहणे, फेस मास्क वापरणे यासारख्या सुरक्षेच्या बाबी पाळणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. आपण सतत पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासंपर्कात आहोत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावाही गडकरी यांनी केला.

कोरोनामुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे असे गडकरी यांनी गुंतवणूकदारांना सुचवले. जागतिक बाजारात आपण आपले उत्पादन पोहोचवू शकतो, असेही ते म्हणाले. कोरोनामुळे अर्थव्यवस्था संकटात आहे. चीनसोबत कोणीही व्यापार करण्यास तयार नाही. कोरोनाचे संकट असले तरी त्यामागे एक संधी दडलेली आहे. आपण भारतीय अर्थव्यवस्था मजबूत बनवू शकतो, असे गडकरी म्हणाले.

कोरोनाचे संकट जागतिक आहे. यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला आहे, हे आपण मान्य करतो. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत करण्यासाठी सर्व समभागधारकांनी एकत्रितपणे यावर काम करणे गरजेचे आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.