ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज काही राज्यांच्या प्रमुखांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

देशामध्ये सोमवारी 11 हजार कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. ही सलग तिसऱ्या दिवशीची उच्चांकी वाढ आहे. एकूण रुग्णांची सख्या 3 लाख 32 हजार झाली आहे तर, 9 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jun 16, 2020, 12:40 PM IST

नवी दिल्ली - अटी आणि शर्थी घालून देशातील लॉकडाउन उठवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील काही मुख्यमंत्र्यांशी आज दुपारी 3 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. एकूण दोन टप्प्यांमध्ये म्हणजे आज आणि उद्या देशातील मुख्यमंत्र्याशी ते संवाद साधणार आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्याशी ते बोलणार आहेत.

आज (16 जून) दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र आणि उर्वरित इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी पंतप्रधान मोदींची उद्या व्हीसी होणार आहे. आजच्या व्हीसीमध्ये पंजाब, केरळ, गोवा, उत्तराखंड, झारखंड, ईशान्येकडील राज्ये आणि काही केंद्रशासीत प्रदेशांच्या मुख्यमंत्र्याशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. आजच्या व्हीसीमध्ये एकूण 21 केंद्रशासित राज्य आणि घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

बुधवारी होणाऱ्या व्हीसीमध्ये एकूण 15 राज्यांचे मुख्यमंत्री आणि जम्मू आणि काश्मिरच्या राज्यपालांचा समावेश आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात इत्यादी महत्त्वांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. देशामध्ये सोमवारी 11 हजार कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. ही सलग तिसऱ्या दिवशीची उच्चांकी वाढत आहे. एकूण रुग्णांची सख्या 3 लाख 32 हजार झाली आहे तर, 9 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.