ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 3, 2020, 2:50 AM IST

देशात आता ७५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी ६.८३ टक्के अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. मागील २४ तासांत देशात ४५ हजार २३० नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्येचा आकडा ८२ लाख २९ हजार ३१३ झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

हैदराबाद - दिवाळी तोंडावर आली असताना देशभरात बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी कोरोना नियमावलीचे पालन करणे हिताचे आहे. देशात आता ७५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी ६.८३ टक्के अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. मागील २४ तासांत देशात ४५ हजार २३० नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्येचा आकडा ८२ लाख २९ हजार ३१३ झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

कोरोना काळात मानसिक आरोग्य धोक्यात

कोरोना महामारीच्या काळात मानसिक आरोग्याची समस्या समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयात मानसिक रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था केली आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी नियमावली जारी केली. कोरोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर सुमारे ३० टक्के रुग्ण मानसिक तणावाखाली असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तसेच कोरोना संसर्गतातून बरे झाल्यानंतर सुमारे ९६ टक्के रुग्णांमध्ये मानसिक तणावाची कमीजास्त प्रमाणात लक्षणे दिसून येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दिल्लीत कोरोनाची लाट, प्रदूषण आणि थंडीचाही परिणाम

मागील काही दिवसात राजधानी दिल्लीत कोरोनाची लाट दिसून येत आहे. शहरातील मोठ्या रुग्णालयातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड पूर्णक्षमतेने भरले आहेत. दिल्लीत प्रदूषणाचा प्रश्न समोर असतानाच हिवाळा सुरू झाला आहे. अशा स्थितीत रुग्णसंख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. विविध उपायांवर सखोलपणे चर्चा करण्यात आली.

सणासुदीच्या काळात बाजार गर्दीने फुलून गेले आहेत. त्यातच अनेकांकडून कोविड नियमावलीचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. सरकारने हॉटस्पॉट परिसरात चाचण्यांची संख्या वाढवली आहे. शहरातील मेट्रो सेवाही कोविड नियमावलीचे पालन करत सुरू आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील स्थिती

आंध्रप्रदेश सरकारने ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिने लॉकडाऊन राहिल्यानंतर आता शाळा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक शिकवणीनंतर हात सॅनिटाईझ करण्यासाठी १५ मिनिटांचा ब्रेक असेल, असे बिशप अझारिया शाळेच्या मुख्याध्यापिकेने सांगितले.

बस सेवेला हिरवा कंदील

सात महिन्यानंतर तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील आंतरराज्य बससेवा सोमवारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही राज्यातील परिवहन विभागांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात बस सेवा बंद करण्यात आली होती. ती आता सुरुळीत झाली आहे.

महाराष्ट्र

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

राजस्थानात मास्क अनिवार्य

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य करणारे राजस्थान हे देशातील पहिलेच राज्य आहे. तसा कायदा राज्य सरकारने पास केला आहे. मास्क हेच कोरोना रोखण्याची लस असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले.

हरयाणा -

SARS-CoV-2 म्हणजेच कोरोना संसर्ग होणाऱ्या विषाणू विरोधातील प्रतिजैविक (अ‌ॅन्टिबॉडी) राज्यातील १४.८ टक्के लोकांमध्ये आढळून आले आहे. दुसरा सिरोप्रिव्हिलन्स सर्व्हे राज्याने सोमवारी जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली. शहरी भागात १९.८ तर ग्रामीण भागात ११.४ टक्के लोकांममध्ये प्रतिजैविक आढळून आले आहे. पहिल्या सर्व्हेमध्ये राज्यात ८ टक्के जनतेत प्रतिजैवक आढळून आले होते.

ओडिशा

राज्यपाल गणेशी लाल आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी राज्यपालांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.