हैदराबाद - पुढील सात ते दहा दिवसात विमान एअरलाईन्सला जास्तीत जास्त 75 टक्के विमाने सुरू परवानगी देण्याची शक्यता असल्याची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पूरी यांनी माहिती दिली. तर देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केला आहे. देशभरातील कोरोना रूग्णांची संख्या 68 लाख 35 हजार 656 वर पोहोचली असून 9 लाख 2 हजार 425 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी 24x7 रेस्टॉरेंट उघडी ठेवण्यासाठी नियोजन केले आहे. दिल्लीत मागील 24 तासात 2 हजार 726 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. तर 37 जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे 2 हजार 643 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
महाराष्ट्र - मुंबईतील धारावीत 8 नवे रुग्ण आढळले. मागील दोन आठवड्यातील ही सर्वाधिक कमी संख्या आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, धारावीतील 2 हजार 820 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला. तर 187 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
कर्नाटक - मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि शालेय शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात आभासी बैठकीचे आयोजन केले होते.
मध्य प्रदेश - गृहमंत्री नरोत्तम मिश्रांनी कोरोना संदर्भातील नवीन नियमावली जाहीर केली आहे.
केरळ - देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या क्रमवारीत केरळ हे तिसरे राज्य आहे. राज्यात 92 हजार 246 जणांवर उपचार सुरू आहे.