ETV Bharat / bharat

भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - india covid live news update

भारत कोरोना संसर्गामध्ये जगात आता तिसऱ्या स्थानी आला आहे. मात्र, इतर देशांशी तुलना करता भारतातील रुग्णांचा मृत्यू दर कमी आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत देशात २९ लाख ७५ हजार ७९४ कोरोनाचे एकूण रुग्ण झाले आहेत. तर ५५ हजार ७९४ जणांचा मृत्यू झाला आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 23, 2020, 4:42 AM IST

हैदराबाद - भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३० लाखांच्या जवळ आला आहे. भारत कोरोना संसर्गामध्ये जगात आता तिसऱ्या स्थानी आला आहे. मात्र, इतर देशांशी तुलना करता भारतातील मृत्यू दर कमी आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत देशात २९ लाख ७५ हजार ७९४ कोरोनाचे एकूण रुग्ण झाले आहेत. तर ५५ हजार ७९४ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही ८ लाखांच्या जवळ आली आहे.

COVID UPDATE
कोरोना अपडेट

दिल्ली - जुलै महिन्यात दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली असतानाच शनिवारी पुन्हा १ हजार ४१२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ६० हजारांच्याही पुढे पोहचला आहे. तर ४ हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मागील २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

झारखंड - झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य शीबू सोरेन आणि पत्नी रुपी सोरेन दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी ही माहिती दिली. शीबू सोरेन राज्याचे माजी मुख्यमंत्रीही होते. शुक्रवारी दोघांचेही घशातील स्वॉबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.

महाराष्ट्र - राज्यात शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यामध्ये दहा दिवसांच्या गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना नियमावलीचे पालन करत नागरिकांना गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अनेक मंडळांनीही सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना केली नाही. प्रशासनाने गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत.

ओडिशा - खासदार आणि बीजेडी पक्षाच्या नेत्या मंजुलता मंडल यांना शनिवारी कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या घरामध्ये अलगीकरणात आहेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मंजुलता मंडल भद्रक मतदार संघातून लोकसभेवर निवडूण गेल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.