ETV Bharat / bharat

चिंता कायम.! देशातील कोरोना रुग्णांची संख्या 13 लाखांवर, मागील 24 तासात 757 मृत्यू - corona positive in india

गेल्या २४ तासात देशात 48 हजार 916 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 13 लाख 36 हजार 861 इतकी झाली आहे.

corona updates india
भारत कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 26, 2020, 6:02 AM IST

हैदराबाद - भारतात दिवसेंगणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून देशात 45 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. तर, 750 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे. शनिवारी देखील देशात 48 हजार 916 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 13 लाख 36 हजार 861 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 757 कोरोना रुग्णांचा मृत्यू झला. त्यामुळे आतापर्यंत देशात एकूण 31 हजार 358 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 4 लाख 56 हजार 71 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर आजवर 8 लाख 49 हजार 431 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona updates india
देशात मागील 24 तासात 48 हजार 916 कोरोना रुग्णांची नोंद, 757 मृत्यू

पाहूयात कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..

महाराष्ट्र

  • मुंबई - महाराष्ट्रात जरी कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी राज्यात आज (शनिवार) सर्वाधिक 7 हजार 227 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून ते प्रमाण आता 56.55 टक्के झाले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 2 लाख 7 हजार 194 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शनिवारी राज्यात महाराष्ट्रात कोरोनाचे 9 हजार 251 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची 3 लाख 66 हजार 368 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आजवर चाचण्यांसाठी पाठवण्यात आलेल्या 18 लाख 36 हजार 920 नमुन्यांपैकी 3 लाख 66 हजार 368 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला 8 लाख 64 हजार 509 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर, 44 हजार 603 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

  • राज्यात आज 9251 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 366368 अशी झाली आहे. आज नवीन 7227 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 207194 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 145481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak

    — Rajesh Tope (@rajeshtope11) July 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - CORONA UPDATE : महाराष्ट्रात ९ हजार २५१ नवे कोरोनाबाधित.. ७ हजार २२७ रुग्णांना डिस्चार्ज

मध्य प्रदेश

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झालेली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी देखील कोरोनाची टेस्ट करावी, तसेच क्वारंटाईन व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. शिवराज सिंह चौहान हे कोरोना पॉझिटिव्ह असलेले देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत.

  • मेरे प्रिय प्रदेशवासियों, मुझे #COVID19 के लक्षण आ रहे थे, टेस्ट के बाद मेरी रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मेरी सभी साथियों से अपील है कि जो भी मेरे संपर्क में आए हैं, वह अपना कोरोना टेस्ट करवा लें। मेरे निकट संपर्क वाले लोग क्वारन्टीन में चले जाएँ।

    — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तसेच, कॅबिनेट मंत्री अरविंद भदोरिया यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायू मेडिकल कॉलेज व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिमाचल प्रदेश

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ पाहता, हिमाचल प्रदेशच्या सलोन भागात कर्फ्यू, लॉकडाऊनसह इतर सर्व उपाययोजना 28 जुलैपर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. याकाळात रहिवासी भागात आणि औद्योगीक भागात प्रशासन दारोदारी जाऊन लोकांची चाचणी करणार आहे. तसेच, आरोग्य विभाग या काळात सर्दी, ताप यांसारख्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आणखीन काही टीम तैणात करणार आहे.

उत्तराखंड

डेहराडून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादम मध्ये असणारा एक प्रशिक्षणार्थी वन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. प्राप्त अहवालानुसार, या घटनेनंतर 50 प्रशिक्षणार्थी सह विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दिल्ली

दिल्लीमध्ये शनिवारी 1 हजार 142 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 लाख 29 पर्यंत पोहचला आहे. तर एकूण कोरोना मृतांचा आकडा 3 हजार 806 इतका झाला आहे.

गेल्या 24 तासात दिल्ली 29 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 लाख 29 हजार 531 इतकी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.