ETV Bharat / bharat

देशात 24 तासात 28 हजार 701 कोरोनाबाधित; पाहा देशातील आढावा एका क्लिकवर... - covid 19 cases in india

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत वाचा सविस्तर बातमी...

corona
देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी...
author img

By

Published : Jul 14, 2020, 2:45 AM IST

हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 28 हजार 701 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. बाधितांची एकूण संख्या 8 लाख 78 हजार 254 इतक झाला आहे. मागील दहा दिवसांपासून बाधितांचा आकडा 22 हजारांचा टप्पा पार करत आहे. देशात सोमवारपर्यंत (13 जुलै) देशात 23 हजार 174 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

corona
देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी...
  • महाराष्ट्र -

कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस राज्यात वाढत असून राज्यात आज(सोमवार) ४ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.

  • नवी दिल्ली -

दिल्ली सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित क्षेत्रातील कोरोनाचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्यात आदेश दिले आहेत. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा उल्लेख यात करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. राजधानी दिल्लीतही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे.

  • मध्य प्रदेश -

मध्य प्रदेशातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याअनुषंगाने राज्यात लॉकडाऊन 2 ची नवी नियमावली सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 2 लागू करण्यात आला आहे. यासाठी फक्त अत्यावश्यक सेवा वगळता बाकीचे सर्व व्यवहार, आस्थापने बंद राहणार आहेत.

दरम्यान, नव्या नियमावलीनुसार लॉकडाऊन 2 मध्ये केवळ 20 लोकांनाच लग्नसोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच कौटुंबिक समारंभासाठी 5 जणांनाचा उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्याचे मध्य प्रदेश सरकारचे धोरण आहे. 14 जुलै ते 20 जुलै या कालावधीत या परीक्षांसाठी अर्ज भरले जातील.

  • बिहार -

बिहारमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांवर गेला आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता राज्यात आता रॅपिड अॅक्शन टेस्टद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. या टेस्टमुळे कमी वेळात जास्तीतजास्त रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. रॅपिड अॅक्शन टेस्टद्वारे केवळ 30 मिनिटांमध्ये कोरोनाचा अहवाल मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

  • ओडिशा -

राज्यात मागील 24 तासात 616 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 13 हजार 737 एकूण कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात आहे. आतापर्यंत 9 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, सोमवारी 505 रुग्णांची कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, मागील 24 तासात 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 70 वर पोहचली आहे.

  • उत्तर प्रदेश -

राज्यात सोमवारी 1 हजार 664 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत एकूण 38 हजार 130 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 24 हजार 203 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात एकूण 12 हजार 972 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, राज्यात एकूण 955 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.