ETV Bharat / bharat

भारतात आतापर्यंत घेतल्या 75 लाख कोरोना चाचण्या... - 75 lakh tests conducted in india

देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. देशात 24 जूनपर्यंत तब्बल 75 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 25, 2020, 5:15 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. देशात 24 जूनपर्यंत तब्बल 75 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 7 हजार 423 (4.16 टक्के) रुग्णांना 'व्हेंटिलेटर सपोर्ट'ची गरज आहे.

देशात 27 हजार 317 ( 15.34 टक्के )रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 28 हजार 301 (15.89 टक्के ) रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे. तसेच भारताचा रिकव्हरी दर हा 56.71 टक्के आहे. जगातील प्रत्येक लाख लोकसंख्येमागे भारतात सर्वांत कमी मृत्यू झाले आहेत. भारतात कोरोना मृत्यूचे प्रमाण हे दर 1 लाख लोकसंख्येमागे 1 आहे, असे जागतीक आरोग्य संघटनने 22 जूनला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. तर जागतीक पातळीवर सरासरी 6.4 असे आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचार हे एकमेव मार्ग आहेत. आयसीएमआरने संबंधित राज्य सरकार, सार्वजनिक आणि खासगी संस्थांना आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे

अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 93 लाख 45 हजार 569 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 4 लाख 78 हजार 949 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 50 लाख 36 हजार 723 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे. बिट्रनमध्ये गेल्या 24 तासांता 154 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 43 हजार 81 वर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.