ETV Bharat / bharat

कोरोनामुळे काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये राहुल गांधींचे पुनरागमन - राहुल गांधी कोरोना विषाणू

मागील वर्षी जूनमध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर, ऑगस्टमध्ये राहुल गांधींनी शेवटच्या कार्यकारिणी बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीमध्येच सोनिया गांधींची काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या एकाही बैठकीला हजेरी लावली नव्हती.

COVID-19 crisis brings Rahul Gandhi back to CWC
कोरोनामुळे काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये राहुल गांधींचे पुनरागमन
author img

By

Published : Apr 2, 2020, 4:18 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या गंभीर संकटाबाबत चर्चा करण्यासाठी गुरूवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधींनीही उपस्थिती दर्शवली होती.

मागील वर्षी जूनमध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर, ऑगस्टमध्ये राहुल गांधींनी शेवटच्या कार्यकारिणी बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीमध्येच सोनिया गांधींची काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या एकाही बैठकीला हजेरी लावली नव्हती.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले, की राहुल गांधींना या बैठकीला पाहून पक्षाने समाधान व्यक्त केले आहे. कारण, राहुल गांधी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगताना दिसत होती.

या बैठकीमध्ये राहुल गांधी म्हणाले , की कोरोना हा मुख्यत्वे वयोवृद्ध व्यक्तींना, फुफ्फुसाचे आजार, मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या लोकांना लक्ष्य करतो आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी सर्व राज्य सरकारांनी विशेष सूचनापत्र प्रसिद्ध करावे.

आम्ही फेब्रुवारीपासूनच कोव्हिड-१९वर लक्ष ठेऊन आहोत, आणि आम्ही याबाबत तज्ज्ञांशी चर्चाही केली आहे. जगातील कोणत्याही देशाने विस्थापित मजुरांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था न करता देशात लॉकडाऊन घोषित केले नाही. भारतातील स्थलांतरीत मजूरांवर लॉकडाऊनदरम्यान आपापल्या घरी परतण्याची जी वेळ आली आहे, तशी कोणत्याही देशातील लोकांवर आली नाही, असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा : इटलीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थीनीने व्हिडीयो शेयर करून मागितली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.