श्रीनगर - काउंटर इंटेलिजन्स काश्मीरने (सीआयके) अनंतनाग जिल्ह्यातील बाजभारामध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सीआयकेने पोलीस आणि सीआरपीएफसमवेत सोमवारी सकाळी बाजभारा शहरातील अनेक ठिकाणी छापा टाकले.
सीआयएच्या पथकाने बाजभाराच्या झारपारा आणि न्यू कॉलनी येथील मोहम्मद सुलतान तिली, सज्जाद अहमद जरगर, मोहम्मद इशाक आणि इतर अनेक लोकांच्या घरांवर छापे टाकले. सूत्रांच्या माहितीनुसार ही कारवाई काही बँक व्यवहारांशी संबंधित आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे काश्मीर खोऱ्यात छापे -
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठय़ाबाबत जम्मू काश्मीर खोऱ्यात छापे टाकण्यात येत आहेत. 29 ऑक्टोबरला एनआयएने काश्मीरमध्ये दहा ठिकाणी छापे टाकले होते. यात काही स्वयंसेवी संस्था, तसेच विश्वस्त संस्थांचा समावेश होता.या स्वयंसेवी संस्थांना अज्ञात स्त्रोतांकडून पैसा मिळत होता व त्याचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता.
हेही वाचा - भरधाव चारचाकी उड्डाणपुलावरून कोसळली... दोघांचा मृत्यू, तर 3 अत्यवस्थ