ETV Bharat / bharat

कोरोना : अजून बरेच अडथळे समोर; लस वितरीत करणे मोठे आव्हान - कोरोना लस वितरण युनिसेफ

सध्या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात असलेल्या कोविड लसीचे कोट्यावधी डोस यशस्वीपणे उत्पादित करणे, हा जगातील सर्वात व्यापक कार्यक्रम आहे. हे डोस संबंधित देशांत पाठविणे आणि ते सुरक्षित स्थितीत लोकांपर्यंत पोहचविणे, हे एक मोठे जिकरीचे काम आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयएटीए) सरकार आणि संबंधित कंपन्यांना आतापासूनच याची तयारी सुरू करण्याचा इशारा दिला आहे. हवाई मार्गाने लसींची वाहतूक करणे सोपी गोष्ट नाही, हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे...

Coronavirus: Many obstacles to be overcome before vaccine reaches to people
कोरोना : अजून बरेच अडथळे समोर; लस वितरीत करणे मोठे आव्हान
author img

By

Published : Sep 21, 2020, 10:17 AM IST

हैदराबाद : युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन फंड अर्थातच युनिसेफ दरवर्षी जगातील निम्म्या मुलांना जीवनरक्षक (जीवनदान देणारी) लस देतात. लाखो लहान मुलांना टेटॅनस, गोवर, पोलिओ, पीतज्वर आणि डांग्या खोकल्यापासून वाचवण्यासाठी अशा लसी दिल्या जातात. युनिसेफ ही संस्था दरवर्षी तब्बल २०० कोटी डोस खरेदी करते आणि १०० देशांतील असंख्य मुलांचे संरक्षण करते. सध्या युनिसेफ ही जगातील सर्वात मोठी लस खरेदी करणारी संस्था असून येत्या काळात जगाभरातील ९२ गरीब देशांना कोविड-१९ ची लस पुरवण्याची जबाबदारी या संस्थेवर असणार आहे.

GAVI- व्हॅक्सीन अलायन्स या कोव्हॅक्स (Covax) प्रोग्रामचे नेतृत्व करत आहे. ज्यांचा उद्देश जगभरातील सर्व लोकांचे लसीकरण करणे हा आहे. या योजनेंतर्गत, कमी उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी कोविड लसीचे संकलन करणे आणि वितरित करण्याची जबाबदारी युनिसेफकडे आहे. सध्या बऱ्याच कोविड लसी क्लिनिकल चाचण्यांच्या विविध टप्प्यात आहेत. यातील जी लस कोरोना विषाणूला रोखण्यात यशस्वी ठरेल, अशा लसीचे पुढील दोन वर्षात कोट्यावधी डोसचे उत्पादन आणि वितरण करणे आवश्यक आहे. सध्या १० देशांतील एकूण २८ लस उत्पादक संस्था कोविड-१९ लस उत्पादन करण्यास तयार आहेत.

धोरणात्मक भागीदारी..

जगातील अब्जावधी लोकांना लस देणे, हे जरा अवघड गणित आहे. क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, खरेदी-पूर्व करार आणि सरकारी अथवा खाजगी कंपन्यांचा निधी मिळवणे आणि नियमावली मंजूर करुन घेणे आदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कोविड लसीचे उत्पादन सुरू करण्यात येईल. पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (पीएएचओ) च्या रिव्हॉल्व्हिंग फंडच्या मदतीने युनिसेफ विकसनशील देशांना ही लस पुरवणार आहे.

कोव्हॅक्स योजनेमध्ये एकूण ८० श्रीमंत देश सहभागी होणार आहेत. या देशांनी स्वतः च्या बजेटमधून कोविड -१९ ची लस खरेदी करण्यासाठीचा निधी उभारला आहे. या देशांना लस खरेदी करुन देण्यामध्ये समन्वयक म्हणूनही युनिसेफ काम करणार आहे. श्रीमंत देशांना त्यांच्या नागरिकांचे लसीकरण स्वतः च्या निधीतून करायचे आहे. या देशांचा निधी सुरुवातीच्या काळात लस उत्पादन वाढविण्यासाठी गुंतवणूक म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे. कोव्हॅक्स उपक्रमात सहभागी होण्यासाठी हे श्रीमंत देश १८ सप्टेंबर रोजी युनिसेफबरोबर करार करतील. कोव्हॅक्स उपक्रमाचा मुख्य उद्देश जगभरातील सर्व देशांना कोविड लस उपलब्ध करुन देणे, हा आहे.

जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, GAVI- द व्हॅक्स अलायन्स, पीएओ, एसईपीआय, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन आदी संस्थांच्या मदतीने युनिसेफ कोव्हॅक्स उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करेल. गरीब देशातील लोकांना लस देण्यासाठी वरील संघटनांची आर्थिक मदत खुप महत्त्वाची ठरणार आहे. GAVI - द व्हॅक्सीन अलायन्स आणि युनिसेफने गेल्या २० वर्षात सुमारे ७६ दशलक्ष मुलांना जीवनदायी लसी दिल्या आहेत, ज्यामुळे तब्बल १.३ दशलक्ष मुलांचे प्राण वाचवता आले आहेत. या अनुभवामुळे कोविड-१९ लसीकरणाची लढाई यशस्वीपणे पूर्णत्वास नेली जाईल.

व्यापक कार्यक्रम..

सध्या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात असलेल्या कोविड लसीचे कोट्यावधी डोस यशस्वीपणे उत्पादित करणे, हा जगातील सर्वात व्यापक कार्यक्रम आहे. हे डोस संबंधित देशांत पाठविणे आणि ते सुरक्षित स्थितीत लोकांपर्यंत पोहचविणे, हे एक मोठे जिकरीचे काम आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयएटीए) सरकार आणि संबंधित कंपन्यांना आतापासूनच याची तयारी सुरू करण्याचा इशारा दिला आहे. हवाई मार्गाने लसींची वाहतूक करणे सोपी गोष्ट नाही, हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोविड लसीचे सुरक्षित आणि वेगात वाहतूक करणे, ही या शतकाच्या इतिहासामध्ये घडणारी एक अभूतपूर्व घटना असेल. कोविड संकटामुळे सध्या संपूर्ण जगभरात हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत किंवा मोठ्या प्रमाणात कमी तरी केली आहेत.

त्यामुळे कोविड लसीची वाहतूक करण्यासाठी आवश्यक तेवढी विमाने सध्या उपलब्ध नाहीत. अनेक विमाने हँगर्समध्ये हलवण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात कोविड लस लक्ष्यित ठिकाणी पोहोचवणे त्रासदायक ठरू शकते, अशी चिंता युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि जीएव्हीआय यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण जगातील ७८० दशलक्ष लोकांपर्यंत प्रत्येकी एक लस पोहोचवण्यासाठी ८ हजार बोईंग विमाने आणि ७४७ जंबो जेट्सची आवश्यकता असेल. स्थानिक ठिकाणी लस उत्पादन केंद्रे असणाऱ्या समृद्ध देशांमध्ये, लस एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात रेफ्रिजरेटेड वाहनांद्वारे नेली जाऊ शकते. पण आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी विमानांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर गरीब देशांमध्ये विमाने उतरवल्यानंतर, त्या देशांकडे रेफ्रिजरेशनची सुविधा असलेल्या वाहनांची असणारी कमतरता आणि असुरक्षित रस्ते, यामुळे अशा देशातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांपर्यंत लस पोहचवणे, हे एक एक आव्हानात्मकच काम आहे. यामुळे अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि कोविड लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी युनिसेफ... सरकारे, प्रोडक्शन, प्रोक्युरमेंट, वाहतूक आणि वितरक एजन्सी यांच्यासमवेत एकत्रितपणे कार्य करत आहे.

लस वाहतुकीसाठी कडक सुरक्षा..

लस तयार झाल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित मिळाल्या पाहिजेत. तसेच या लसींचे डोस ठरावीक तपमानात संकलित करुन ठेवले पाहिजेत. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी या लसीचे जलद गतीने वितरण केले पाहिजे. यामध्ये रेफ्रिजरेशन सुविधांना प्रथम प्राधान्य असावे. कारण कोणतीही चूक झाल्यास लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आवश्यक असणारी नवीन कोल्ड स्टोरेज तयार करण्याचे आणि जुन्या रेफ्रिजरेटेड स्टोरेजमध्ये बदल करण्याचे काम आतापासून सुरू करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ही लस पोषक तापमानात सुरक्षितपणे ठेवू शकतील, अशा असंख्य प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही जगाला मोठी गरज आहे. साठवणूक आणि वाहतूक प्रक्रियेदरम्यान लस खराब होणार नाही, याची खात्री करण्यासाठी सातत्याने याची देखरेख करावी लागणार आहे. गरज पडल्यास त्यासाठी पूरक यंत्रणाही उभारावी लागेल. त्याचबरोबर हवाई मार्गाने लसीची वाहतूक करताना लसींची चोरी होणार नाही, यासाठी भक्कम सुरक्षिततेची व्यवस्था करायला लागेल. त्याचबरोबर संबंधित देशांच्या सीमारेषा ओलांडताना, आरोग्य आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित कागदपत्रे आणि परवानगी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. त्यासोबतच लस वाहतूक करणारी विमाने संबंधित विमानतळांवर उतरू शकण्यास किंवा लँडिंगशिवाय हवेतून आपला प्रवास सुरू ठेवण्यास सक्षम असावीत. त्याचबरोबर अशा विमानातून उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि वैमानिकांना विलगीकरण आणि कर्फ्यूच्या नियमातून सूट देण्यात यावी. असे विमान जेव्हा एखाद्या देशात उतरेल, तेव्हा लस वितरीत करण्याची परवानगी प्राधान्याने दिली जावी. यामुळे ही लस शक्य तितक्या लवकर सुरक्षित अवस्थेत सुरक्षित ठिकाणी पोहोचवता येईल. तापमानात होणाऱ्या बदलामुळे लस खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लस खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे, फार महत्त्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.