नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. गेल्या काही महिन्यात देशामध्येही कोरोनाबाधित वाढत असून दररोज सर्वाधिक कानावर पडणारा शब्द म्हणजे ‘कोरोना’. हा शब्द प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच उच्चारला असणार. महामारीनंतर कोरोना हा शब्द जगभर प्रसारीत झाला. मात्र, कोरोना महामारीच्या 7 वर्षांपूर्वीच केरळमधील एका व्यक्तीने आपल्या दुकानाचे नाव कोरोना ठेवले होते. वस्तुमुळे नाही, तर नावामुळे हे दुकान सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
केरळच्या कोट्टायम जॉर्ज नावाच्या व्यक्तीने कोरोना नावाचे दुकान 7 वर्षांपूर्वी सुरू केले. कोरोना एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ताज (क्राऊन) होतो. या कोरोना नावाच्या दुकानात किचन, वार्डरोबचे सामान मिळते. कोरोना नावामुळे त्यांचे दुकान प्रसिद्ध झाले असून त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळत असल्याचे जार्ज यांनी सांगितले.
जुळ्यांची ठेवली 'कोरोना' अन् 'कोविड' नावे -
रायपूरमधील एका दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मुलांना 'कोरोना' अन् 'कोविड' ही दोन नावे दिली आहेत. लॉकडाऊनच्याकाळात त्यांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागले, त्याची आठवण रहावी म्हणून त्यांनी जुळ्यांची नावे अशी ठेवल्याचे पालकांनी सांगितले. तसेच आंध्र प्रदेशमधील दोन महिलांनीही आपल्या मुलांचे नाव कोरोना असे ठेवले होते.
हेही वाचा - देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर