ETV Bharat / bharat

इंदूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्ताने काढला पळ - patients ran away from hospital

शहरातील एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आणि एक संशयित रुग्णाने रुग्णालयातून पळ काढला. यानंतर आरोग्य विभाग, पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना परत रुग्णालयात आणले आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांना या दोघांनाही पकडण्यात यश आले.

इंदूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी काढला पळ

author img

By

Published : Mar 30, 2020, 10:58 AM IST

इंदूर - शहरातील एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आणि एक संशयित रुग्णाने रुग्णालयातून पळ काढला. यानंतर आरोग्य विभाग, पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना परत रुग्णालयात आणले आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांना या दोघांनाही पकडण्यात यश आले.

इंदूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी काढला पळ

शहरातील दोन रुग्णांना इंदूरमधील महाराजा यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी एक बाधित होता तर, दुसरा संशयित होता. खाली फिरुन येतो, असे सांगून या दोघांनीही पळ काढला आणि थेट नातेवाईकांकडे पोहोचले.

आरोग्य विभागाला रुग्णांनी पळ काढल्याची माहिती मिळताच ते पोलिसांच्या मदतीने रुग्णांच्या घरी पोहोचले. मात्र, दोघेही त्याठिकाणी नव्हते. त्यानंतर मिळालेल्या सूचनेच्या आधारे पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचले. तेथून पकडून त्यांना रुग्णालयात दाखल केले. संबंधित नातेवाईंकांच्या घरातील एका सदस्याला तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. तसेच हे दोघेही इतरत्र ज्या परिसरात फिरले, तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.