नवी दिल्ली - मागील 24 तासात देशभरात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 478 रुग्ण नव्याने सापडल्याने देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 547 वर पोहोचला आहे. यातील 2 हजार 322 रुग्ण सक्रिय म्हणजेच अॅक्टिव आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
-
The highest ever spike of 478 #Coronavirus positive cases has been recorded in the last 24 hours. The total positive cases in the country stand at 2547. https://t.co/gac4T8abCN
— ANI (@ANI) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The highest ever spike of 478 #Coronavirus positive cases has been recorded in the last 24 hours. The total positive cases in the country stand at 2547. https://t.co/gac4T8abCN
— ANI (@ANI) April 3, 2020The highest ever spike of 478 #Coronavirus positive cases has been recorded in the last 24 hours. The total positive cases in the country stand at 2547. https://t.co/gac4T8abCN
— ANI (@ANI) April 3, 2020
एकूण रुग्णांमधील 162 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांमळे देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. तामिळनाडूतील रुग्णांचा आकडा 400पेक्षा जास्त झाला आहे. या कार्यक्रमाला गेलेल्या 600पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.