ETV Bharat / bharat

मोदी व शाहांविरोधात कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोग उदासीन,  काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

author img

By

Published : Apr 30, 2019, 12:15 PM IST

देव यांनी भाजपच्या नेतृत्वाविरोधात केलेल्या तक्रारींवर निर्वाचन आयोगाने निष्क्रियता दाखविली असून हा 'पक्षपात' असल्याचा आरोप केला आहे. भाजप नेत्यांनी मागील ४ आठवड्यांत आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. मात्र, परंतु निवडणूक आयोगाने  काँग्रेसच्या ४०हून अधिक तक्रारींवर कोणताही निर्णय घेतलेला नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचा पक्षपात

नवी दिल्ली - काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. याविषयी निवडणूक आयोगाकडे (ईसी) तक्रार करूनही काहीही कारवाई केली जात नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली असून लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. यावर न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या भाषणांमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे यासंबंधी भाजप नेत्यांवरही कारवाईची भूमिका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने याचिकेद्वारे केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठाने यावर सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. आसामच्या सिलचर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ही मागणी केली होती. सुष्मिता देव या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षही आहेत.

देव यांनी भाजपच्या नेतृत्वाविरोधात केलेल्या तक्रारींवर निर्वाचन आयोगाने निष्क्रियता दाखविली असून हा 'पक्षपात' असल्याचा आरोप केला आहे. 'ही मनमानी लोकशाहीच्या पवित्रतेसाठी नुकसानकारक आहे. भाजप नेत्यांनी मागील ४ आठवड्यांत आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. मात्र, परंतु निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या ४०हून अधिक तक्रारींवर कोणताही निर्णय घेतलेला नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.

यानंतर न्यायालयाने या भाजप नेत्यांची नाव विचारली असता, मोदी आणि शाह यांची नावे प्रामुख्याने समोर आली. 'ते द्वेष उत्पन्न करणारी भाषणे करत आहेत. निवडणूक आयोगाच्या स्पष्ट बंदीनंतरही राजकीय प्रचारासाठी वारंवार देशाच्या संरक्षण दलांचा वापर केला जात आहे,' असे त्यांनी म्हटले आहे. देव यांनी या याचिकेत मोदी आणि शाह यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. 'मोदींनी एक एप्रिलला महाराष्ट्रात वर्धा येथील भाषणात पहिल्यांदा आचार संहितेचे उल्लंघन केले. त्यांनी भगव्या दहशतवादाचा मुद्दा उचलला. त्यांनी केरळमधील भाषणातही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वायनाडमधून निवडणूक लढण्याचा मुद्दाही उपस्थित केला होता,' आदी घटनांचा उल्लेख केला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.