म्हैसूर - सध्या कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळावर त्यांच्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली आहे. मात्र, या मागचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
-
#WATCH: Congress leader and Karnataka's former Chief Minister Siddaramaiah slaps his aide outside Mysuru Airport. pic.twitter.com/hhC0t5vm8Q
— ANI (@ANI) September 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH: Congress leader and Karnataka's former Chief Minister Siddaramaiah slaps his aide outside Mysuru Airport. pic.twitter.com/hhC0t5vm8Q
— ANI (@ANI) September 4, 2019#WATCH: Congress leader and Karnataka's former Chief Minister Siddaramaiah slaps his aide outside Mysuru Airport. pic.twitter.com/hhC0t5vm8Q
— ANI (@ANI) September 4, 2019
यापुर्वी सिद्धरामय्या यांचा म्हैसूरमध्ये एका कार्यक्रमात महिलेला धमकावत तीच्याशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर सिद्धरामय्या यांनी संबधीत महिला आपल्याला बहिणीसारखी असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर महिलेने स्वत:ची चूक असल्याचे सांगितले होते.
-
#WATCH Former Karnataka Chief Minister and Congress leader Siddaramaiah misbehaves with a woman at a public meeting in Mysuru. #Karnataka pic.twitter.com/MhQvUHIc3x
— ANI (@ANI) January 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Former Karnataka Chief Minister and Congress leader Siddaramaiah misbehaves with a woman at a public meeting in Mysuru. #Karnataka pic.twitter.com/MhQvUHIc3x
— ANI (@ANI) January 28, 2019#WATCH Former Karnataka Chief Minister and Congress leader Siddaramaiah misbehaves with a woman at a public meeting in Mysuru. #Karnataka pic.twitter.com/MhQvUHIc3x
— ANI (@ANI) January 28, 2019
हे ही वाचा - कर्नाटकमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के शिवकुमार यांना ईडीकडून अटक
सध्या राज्यात काँग्रेस संकटामध्ये सापडली आहे. सत्तांतर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार सध्या संकटात सापडले असून त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतून अटक केली आहे. त्यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ते कर्नाटकचे माजी मंत्री होते.