नवी दिल्ली - आज रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरात काँग्रेसतर्फे जिल्हास्तरासह राज्यस्तरावर सुरू असलेल्या आंदोलनांचा समारोप या भारत बचाओ रॅलीने होणार आहे.
काँग्रेसने 15 नोव्हेंबरपासून देशभरातील विविध भागांत आंदोलने सुरू केली आहेत. यातून केंद्रातील भाजपप्रणित सरकारच्या फसलेल्या धोरणांचा निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर भारत बचाव रॅली काढण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या लोकविरोधी कार्यक्रमामुळे देशात सध्या बिकट स्थिती आहे. आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांवरील संकट, बेरोजगारी आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.