नवी दिल्ली/गाजियाबाद - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना टक्कर देण्यासाठी लखनौमध्ये काँग्रेसकडून आचार्य प्रमोद कृष्णम यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसकडून मंगळवारी उत्तरप्रदेशच्या दोन आणि मध्यप्रदेशच्या एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कृष्णम उद्या (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
राजनाथ सिंहांना टक्कर देणार काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णम
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना टक्कर देण्यासाठी लखनौमध्ये काँग्रेसकडून आचार्य प्रमोद कृष्णम यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसकडून मंगळवारी उत्तरप्रदेशच्या दोन आणि मध्यप्रदेशच्या एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कृष्णम उद्या (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
नवी दिल्ली/गाजियाबाद - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना टक्कर देण्यासाठी लखनौमध्ये काँग्रेसकडून आचार्य प्रमोद कृष्णम यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसकडून मंगळवारी उत्तरप्रदेशच्या दोन आणि मध्यप्रदेशच्या एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कृष्णम उद्या (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
राजनाथ सिंहांना टक्कर देणार काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णम
नवी दिल्ली/गाजियाबाद - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना टक्कर देण्यासाठी लखनौमध्ये काँग्रेसकडून आचार्य प्रमोद कृष्णम यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसकडून मंगळवारी उत्तरप्रदेशच्या दोन आणि मध्यप्रदेशच्या एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कृष्णम उद्या (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपच्या पापाचा घडा आता भरला आहे, त्यामुळे लखनौमध्ये माझ्यासमोर कोणतेही मोठे आव्हान नाही. राजकारणात कोणीही मोठा अथवा छोटा असत नाही. ज्याच्यावर जनता प्रेम करते, सन्मान देते आणि परमात्मा ज्याच्यासोबत असतो तो आपोआप सरस ठरतो. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे विशेषत: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे आभार मानले.
भाजपचे नेते देवाला पण विसरले
भाजप नेते देवाला तर विसरले आहेतच आणि जनतेलाही विसरले आहेत. २०१९ ची निवडणूक ही खरे आणि खोटे यांच्यातील लढाई आहे. ही निवडणूक अहंकाराच्या विरोधात आहे. माझ्या लखनौ नवा नाही आणि येथील जनतेला मी नवा नाही. लखनौकरांच्या प्रेमाने मी विजयी होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपवर टीका
हिमाचल प्रदेशमध्ये सोनिया गांधींच्या विषयी भाजप अध्यक्षाने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी याप्रकारची वक्तव्ये करतच पाच वर्षे घालवली आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माझ्यावर देखील चुकीच्या पद्धतीने टीका करण्यात आली आहे. भाजपला सत्तेचा अहंकार आला आहे. या देशाची जनता त्यांचा अहंकार संपवून टाकेल, असे कृष्णम म्हणाले.
Conclusion: