ETV Bharat / bharat

राजस्थान: कार-ट्रकमध्ये टक्कर, 3 जागीच ठार, 2 जखमी - अजमेर येथे कार आणि ट्रकची समोरासमोर टक्कर

किशनगड, अजमेर येथे कार आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 3 लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 लोक जखमी झाले.

Road accident in Rajasthan
राजस्थान: कार-ट्रकमध्ये टक्कर
author img

By

Published : Oct 26, 2020, 6:39 AM IST

अजमेर- जिल्ह्यातील संगमरवरी शहर किशनगड येथे रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 लोक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर लोकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

अजमेर येथे भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, किशनगड विमानतळ, गांधीनगर पोलीस स्टेशन परिसरातील टर्निंग पॉईंटवर कार आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की कारच्या चिंधड्या उडाल्या आणि कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना 108 रुग्णवाहिकांच्या मदतीने राज्य यज्ञ नारायण रुग्णालयात नेण्यात आले.

मृतांचे मृतदेह रुग्णालयात ठेवले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.