शिमला - हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात येत्या 24 तासांत पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. याच वेळी शनिवारी थंडीने आपली येथील पकड आणखी घट्ट केली आहे.
'15 ते 16 नोव्हेंबरदरम्यान राज्यात बर्याच ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे,' असे हवामान कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
'कॅस्पियन समुद्रापासून येणारी आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रदेश ओलांडून येणारी वादळे शनिवारी रात्रीपर्यंत येथे पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे लाहौल आणि स्पीती, चंबा, कुल्लू, किन्नौर, सिरमौर आणि शिमला जिल्ह्यांच्या उंचावरील भागात 17 नोव्हेंबरपर्यंत हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होऊ शकेल,' असे या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - मनाली, रोहतांगचे सुंदर दृश्य; कोरोना-लॉकडाऊनमुळे प्रदूषणाची पातळी घटली
शिमला, कुफरी, कसौली, धर्मशाळा, पालमपूर, सोलन, नाहन, बिलासपूर, उना, हमीरपूर आणि मंडी यासारख्या राज्यातील खालच्या भागात पावसाचा जोर कायम राहील आणि यामुळे तापमान अधिक घसरण्याची शक्यता आहे.
शनिवारी शिमला येथे किमान तापमान 8.9 अंश सेल्सियस होते. तर, मनालीमध्ये ते 1.2 अंश, कल्पा येथील तापमान 2.4 डिग्री, डलहौसीमध्ये 8.4 आणि धर्मशालामध्ये 10 अंश सेल्सियस नोंदवले गेले.
लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील केलाँग हे शून्य ते 0.2 अंश सेल्सिअस तापमान असलेल सर्वात थंड ठिकाण होते. या हंगामात येथे आधीच हिमवृष्टी झाली होती.
हेही वाचा - अभिनेत्री रविना टंडन वेब सीरिजच्या शूटिंगसाठी मनालीत