ETV Bharat / bharat

आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचे नाव बदलले, आता होणार 'छत्रपती शिवाजी महाराज' - मुघल संग्रहालय आग्रा

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

author img

By

Published : Sep 15, 2020, 2:40 AM IST

लखनौ - आग्र्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या एका मुघल संग्रहालयाचे नाव बदलून त्याला 'छत्रपती शिवाजी महाराज' असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ही तमाम शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

मुघल आपले नायक कसे काय असू शकतात? शिवाजींच्या नावामुळे आम्हाला राष्ट्रवाद आणि स्वाभिमान या भावनेने अभिमान वाटेल. गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतिक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान असणार नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता आग्रा येथे बांधण्यात येणारे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करूनही माहिती दिली आहे.

  • आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।

    आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।

    हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।

    जय हिन्द, जय भारत।

    — Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आग्रा येथील ताजमहाल या प्रसिद्ध वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते, तेव्हा या संग्रहालयाचे बांधकाम सुरू झाले होते. काही दिवसांपासून या संग्रहालयाचे नाव बदलण्याची चर्चा सुरू होती. या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

हेही वाचा - नव्वदी पार दोघांची कोरोनावर मात, रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन परतले घरी

हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह महिलेला निगेटिव्ह सांगून पाठवले घरी, दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.