नवी दिल्ली - देशातील सर्वांत जास्त सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगात आज पोलीस आणि कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये 12 ते 14 कैदी जखमी झाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बराकी क्रमांक 4 मध्ये ही घटना घडली. येथे कैदी आपल्या बराकीत जाण्यास तयार नव्हते.
याप्रकरणी अधिक माहितीसाठी तुरुंग प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.