ETV Bharat / bharat

गँगस्टर विकास दुबेकडील 500 कोटींच्या मालमत्तेबाबत पत्नीने ही' दिली प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 24, 2020, 12:50 PM IST

विकास दुबेची पत्नी रिचा दुबेची एका माध्यमाने मुलाखत घेतली. या मुलाखतीत रिचा दुबे म्हणाल्या, की आज, आम्हाला त्यांची खूप गरज आहे. त्यांनी आमच्यासाठी काहीही ठेवले नाही.

डावीकडे गँगस्टर विकास दुबे आणि उजवीकडे त्याची पत्नी रिचा दुबे

लखनौ – विकास दुबेने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे वृत्त खोटे असल्याचे दुबेच्या पत्नीने सांगितले. पतीने आमच्यासाठी काहीही ठेवले नसल्याचा दावा दुबेच्या पत्नीने केला आहे.

गुन्हेगारीचा मार्ग सोडावा, यासाठी पतीला समजावून सागंण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते, असे एनकाउन्टर करण्यात आलेल्या गँगस्टर विकास दुबेच्या पत्नीने म्हटले. आता, त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंब अडचणीत सापडल्याचा दावा दुबेच्या पत्नीने केला आहे.

विकास दुबेची पत्नी रिचा दुबेची एका माध्यमाने मुलाखत घेतली. या मुलाखतीत रिचा दुबे म्हणाल्या, की आज, आम्हाला त्यांची खूप गरज आहे. त्यांनी आमच्यासाठी काहीही ठेवले नाही. लोक म्हणू शकतात, आमच्यासाठी त्यांनी 500 कोटींची मालमत्ता ठेवली आहे. पण, खरी स्थिती अशी आहे, की आमच्याकडे काहीही नाही.

दुबेची कोट्यवधीची मालमत्ता दुबईसारख्या ठिकाणी आहे का, असा प्रश्न गँगस्टरच्या पत्नीला विचारण्यात आला. त्यावर रिचा दुबे म्हणाल्या, की हे पूर्णपणे खोटे वृत्त आहे. केवळ विचार करा, जर कोट्यवधींची मालमत्ता असती तर त्याची पत्नी लखनौमध्ये 1,600 स्क्वेअर फुटांच्या घरात राहिली असती का? गुन्हेगारीपासून मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, माणूस म्हणून विकास दुबेची वृत्ती वेगळी होती, असा रिचा यांनी दावा केला.

पुढे, त्या मुलाखतीत म्हणाल्या, की पती आणि वडील म्हणून ते चांगले होते. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, पतीला कधीही गुन्हेगारी जगतामधून बाहेर येवू वाटत नव्हते. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मारहाण केली जात होती. पतीने पोलिसांना मारून टाकण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले होते. त्यांना थांबविण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते, असा दावाही रिचा दुबे यांनी केला.

बिकरू गावात विकास दुबेने गोळीबार करून पोलिसांना ठार केले. त्या पोलिसांच्या पत्नींची रिचा दुबेंनी मुलाखतीत माफी मागितली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.