ETV Bharat / bharat

'नरेंद्र मोदींनी कोणत्याही धर्मसंकटात पडू नये, त्यांनी आघाडी धर्म पाळावा' - Chirag Paswan hits out at nitish kumar

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लोजपा एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे भाजपाची कोंडी झाल्याचे म्हटले जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडी धर्म पाळावा. त्यांनी माझ्यामुळे धर्मसंकटात पडू नये. नितीश कुमार यांना खूश करण्यासाठी माझ्या विरोधात बोलावे लागले. तर, त्यांनी नि:संकोचपणे बोलावे, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.

चिराग पासवान
चिराग पासवान
author img

By

Published : Oct 18, 2020, 3:01 PM IST

बिहार - बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार असून सर्व पक्ष मैदानात उतरले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) साथ सोडत लोकजन शक्ती पार्टी (लोजपा) स्वबळावर निवडणूक लढत आहे. रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पक्षाची सर्व जबाबदारी चिराग पासवान यांच्यावर येऊन पडली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लोजपा एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे भाजपाची कोंडी झाल्याचे म्हटले जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडी धर्म पाळावा. त्यांनी माझ्यामुळे धर्मसंकटात पडू नये. नितीश कुमार यांना खूश करण्यासाठी माझ्या विरोधात बोलावे लागले. तर त्यांनी नि:संकोचपणे बोलावे, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.

  • मैं नहीं चाहता की मेरी वजह से प्रधानमंत्री @narendramodi जी किसी धर्मसंकट में पड़े। वे अपना गठबंधनधर्म निभाए।आदरणीय मौजूदा मुख्यमंत्री @NitishKumar जी को संतुष्ट करने के लिए मेरे ख़िलाफ़ भी कुछ कहना पड़े तो निस्संकोच कहे।

    — युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चिराग पासवान यांनी आज टि्वट करत अप्रत्यक्षपणे नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी प्रचारामध्ये पूर्ण जोर लावला असून ते लोजपा आणि भाजपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदींसोबत असलेल्या संबंधाचे मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. वडील रुग्णालयात असताना, त्यांनी माझ्यासाठी जे केले, ते मी कधीच विसरू शकत नाही, असे चिराग पासवान म्हणाले.

माझ्यामुळे नरेंद्र मोदींनी कोणत्याही धर्मसंकटात पडावे, असे मला वाटत नाही. त्यांनी आपला आघाडीचा धर्म निभवावा. नितीश कुमार यांचे मन राखण्यासाठी ते माझ्याविरोधात नि:संकोचपणे बोलू शकतात, असेही ते म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणूक 2020मध्ये लोकजनशक्ती पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. एलजेपी जवळपास 143 विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उतरवणार आहे. यापूर्वी लोकजनशक्ती पक्षाने 2005 सालीही विधानसभा निवडणुकी स्वबळावर लढवत शानदार प्रदर्शन केले होते. 2019 लोकसभा निवडणुकीवेळी लोजपा, जनता दल युनायडेट (संयुक्त) आणि भाजपा यांची महाआघाडी होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.