चैन्नई - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर असून आज त्यांचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली आहे. तुमच्या आदरतिथ्याने आम्ही भारावून गेलो आहोत. हा अनुभव आमच्यासाठी कायम आठवणीत राहील, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान दोन्ही देशाचे प्रतिनिधीमंडळ चर्चा करत आहे. यामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सहभागी झाले आहेत.
-
Chinese President Xi Jinping: We are really overwhelmed by your hospitality. Me and my colleagues have felt that very strongly. This will be a memorable experience for me and us. https://t.co/i5ZbBUj75r pic.twitter.com/bzSJERHR7y
— ANI (@ANI) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Chinese President Xi Jinping: We are really overwhelmed by your hospitality. Me and my colleagues have felt that very strongly. This will be a memorable experience for me and us. https://t.co/i5ZbBUj75r pic.twitter.com/bzSJERHR7y
— ANI (@ANI) October 12, 2019Chinese President Xi Jinping: We are really overwhelmed by your hospitality. Me and my colleagues have felt that very strongly. This will be a memorable experience for me and us. https://t.co/i5ZbBUj75r pic.twitter.com/bzSJERHR7y
— ANI (@ANI) October 12, 2019
गेल्या २ हजार वर्षाच्या कालखंडामध्ये भारत आणि चीन जगातील प्रमुख आर्थिक शक्ती राहिले आहेत. ती स्थिती आपण पुन्हा प्राप्त करू शकतो. आपल्या दरम्यान असलेले मतभेद दोघांच्या सहमतीने सोडवण्यात येईल. आपले संबंध जगामध्ये शांतता प्रस्थापीत करतील, वुहानमध्ये झालेल्या भेटीमुळे आपल्या नात्यामध्ये मजबूती आल्याचं मोदी म्हणाले. ही बैठक अनौपचारिक असून दोन्ही देश वेगवेगळे पत्रक जारी करतील. यापूर्वी २०१८ मध्ये चीनमधील वुहान शहरात अनौपचारिक बैठक झाली होती.
आजचे वेळापत्रक-
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चेन्नईमधील ग्रँड चोला या पंचतारीका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथून जिनपिंग पुन्हा महाबलीपूरमसाठी रवाना झाले आहेत. महाबलीपूरममध्ये दोन्ही नेत्यांची अनौपचारिक बैठक होणार आहे. होईल. या बैठकीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्यावर चर्चा होईल. त्यानंतर पुन्हा प्रतिनिधी स्तरावर बैठक होईल. यामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभाग घेतील. ११ वाजून ४५ मिनिटांनी जिनपिंग स्नेहभोजन घेतील. त्यानंतर १२ वाजून ४५ मिनिटांनी ते चेन्नई विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी जिनपिंग नेपाळला रवाना होणार आहेत.
शुक्रवारी महाबलीपूरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना महाबलीपुरम येथील मंदिरांचे दर्शन घडवले. त्यानंतर पंचरथ येथे दोन्ही नेत्यांनी नारळपाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मोदींनी दोन खास भेटवस्तू जिनपिंग यांना दिल्या आहेत.