ETV Bharat / bharat

'चीनची अर्थव्यवस्था खराब स्थितीत, त्यांना युद्ध परवडणारं नाही'

author img

By

Published : Jun 18, 2020, 9:01 PM IST

चीनमधून कोरोना महामारीचा उगम झाल्यानंतर चीनवर जगभरातून टीका होत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी विषाणूचा उगम कसा झाला, याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे चीनची जागतिक स्तरावर मानहाणी होत आहे. त्यातून चीनने आक्रमक धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

चीनची अर्थव्यवस्था
चीनची अर्थव्यवस्था

हैदराबाद - चीनची अर्थव्यवस्था ढासळलेली असून त्यांना युद्ध परवडणारे नाही, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ कमर आघा यांनी व्यक्त केले आहे. चीनची अर्थव्यवस्था व्यापारावर अवलंबून असून कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर निर्यात कमी झाली असल्याचे आघा म्हणाले.

कमर आगा यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेसंबधी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. ‘चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून असून मागील काही दिवसांपासून निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे चीनवर आर्थिक संकट येण्याची चिन्हे दिसत आहेत. चीन भारताला व्यापारातील प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. कोरोनामुळे विविध अमेरिकन आणि युरोपीयन कंपन्या आपले उत्पादन भारतात हलविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत भविष्यात उत्पादन केंद्र बनेल याची चीनला भीती वाटत आहे’, असे आघा म्हणाले.

चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांची प्रशासनावरील पकड सैल होत आहे. एकीकडे चीनचे नेतृत्त्व शांततेची भाषा करत आहे, तर दुसरीकडे चीनी लष्कर आक्रमक कृत्ये करत आहे, असे आगा म्हणाले.

चीनमधून कोरोना महामारीचा उगम झाल्यानंतर चीनवर जगभरातून टीका होत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी विषाणूचा उगम कसा झाला, याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे चीनची जागतिक स्तरावर मानहाणी होत आहे. अशातच अनेक देश कोरोनाचा नायनाट करण्यासाठी काम करत असताना चीन या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने भारतासह अनेक शेजारी देशांबरोबर दादागिरीचे धोरण स्वीकारले आहे. चीनने ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांबरोबचा व्यापार कमी केला आहे. मात्र, चीनपुढील अ़डचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.