जयपूर - देवाच्या नावाने लोकांना लुटल्याचे अनेक किस्से आपण पाहिले किंवा ऐकलेही असतील. पण, देवाच्या नावाने शिधापत्रक तयार करुण गरिबांच्या तोंडचे घास पळविण्याचे काम राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील अरुआ गावात सुरु आहे. विशेष म्हणजे हा गोरखधंदा मागील चार वर्षापासून बिनबोभाट सुरू होता.
मरहोली पंचायतीच्या अरुआ गावात एक श्री कृष्णाचे मंदिर आहे. मंदिर में शालिग्राम, राम, लक्ष्मण, सीता, महादेव आणि पुजारीच्या नावाने शिधापत्रक आहे. या रेशन कार्डने रेशन दुकानदारांकडून चार वर्षांपासून रेशन घेतला जातो. मंदिरच्या प्रसादासाठी या दुकानदारांकडून अन्नाचा एक कणही दिला जात नाही.
असा उघडकीस आला प्रकार
ग्रामस्थ जेव्हा रेशन घेण्यासाठी पोहोचले तेव्हा रेशन दुकानदारांनी त्यांना बायोमॅट्रिकमध्ये अंगठा लागत नसल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थ परत गेले. या नंतर ग्रामस्थाने आपली तक्रार ई-मित्रकडे पोहोचले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
4 वर्षांपासून सुरु होता प्रकार
श्रीकृष्णाच्या परिवारातील 7 सदस्यांची नावे रेशन दुकानदारांकडून हडप केले जात आहे. या बनावट कार्डद्वारे रेशनदुकानदारांकडून मागील 4 वर्षांपासून गहू आणि रॉकेल घेत ते काळाबाजारी करत विकले जात आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
ई-मित्रकडून मिळाली माहिती
ई-मित्रकडून माहिती घेतल्यानंतर 075669 00002 हा शिधापत्र क्रमांक उपलब्ध झाले. या रेशन कार्डनुसार ठाकुरजी म्हणजेच श्रीकृष्ण हे कुटुंबप्रमुख आहेत. तसेच सीता, राम, लक्ष्मण, शालिग्राम, पुजारी आणि महादेव हे सर्व कौटुंबिक सदस्य आहेत.
मागील 4 वर्षांपासून या ग्राम पंचायतमध्ये अनेक रेशन दुकानदार बदलले गेले. यामध्ये निनुआ राम, शीलादेवी, लोकेश आणइ रमाकांत शर्मा या दुकानदारांनी देवाच्या नावाने अन्नधान्य घेतले.
हेही वाचा - आरोग्य सेतू अॅप सरकारी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक