ETV Bharat / bharat

चांद्रयान-२ च्या माध्यमातून भारत इतिहास घडवणार - इस्रोचे माजी शास्त्रज्ञ

नासाकडून आपल्या कोणतीही सहाय्यता मिळाली नाही. उलट, चांद्रयान-२ च्या माध्यमातून इस्रो नासाला पहिल्यांदा मदत करणार आहे. चांद्रयान-२ योजनेतून भारताचे नाव उज्वल होणार आहे.

author img

By

Published : Jul 21, 2019, 6:38 PM IST

Updated : Jul 22, 2019, 3:00 AM IST

चांद्रयान-२

मुंबई - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ च्या उड्डाणाची पूर्व चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारत पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी २२ जुलैला चांद्रयान-२ चे उड्डाण होणार आहे. निमित्ताने भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहाच वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. याच धर्तीवर ईटीव्ही भारतने चांद्रयान-१ योजनेत काम केलेल्या मक्बूल अहमद यांच्याशी चर्चा केली.

चांद्रयान-२ मोहिमेबद्दल इस्रोचे माजी शास्त्रज्ञ मक्बूल अहमद यांची प्रतिक्रिया

इस्रोचे माजी शास्त्रज्ञ मक्बूल अहमद म्हणाले, क्रायोजेनिक इंजिनमध्ये आलेल्या बिघाडाला इतक्या लवकर दुरुस्त करता येईल, असे कधीही वाटले नव्हते. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सच्या पथकाचे कौतुक करावयास हवे. क्रायोजेनिक इंजिनातील लीक पहिल्यांदा छोटा आहे म्हणून सांगण्यात आला होता. परंतु, हे लीक पुन्हा मोठे निघाले. एका आठवड्यात याची दुरुस्ती करण्यात आले हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आता आपण चंद्राकडे जात आहोत ही भारतासाठी खूप मोठी उपलब्धता आहे.

चांद्रयान-२ मोहिमेबद्दल माहिती देतान अहमद म्हणाले, जीएसएलव्ही २०० ते २० हजार किलोमीटरच्या कक्षेत यानाला ठेवण्याचे काम करणार आहे. या कक्षेत पहिल्यांदा जोडणीचे काम होणार आहे. येथे पोहचण्यासाठी २० ते २२ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या कक्षेत पोहचण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याआधीही खूप वेळा या कक्षेत पोहचण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. परंतु, भारताकडील पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही या दोघांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. एकदा जोडणी पार पडल्यानंतर कक्षेत वाढ करण्यात येणार आहे. लिक्वीड ऑपोजिव मोटारला (लॅम) फायर करुन कक्षा ४ वेळा कक्षा वाढवण्यात येणार आहे. यानंतर जवळपास एक आठवडा किंवा १० दिवसानंतर आपल्याला चंद्रावर पोहचण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज मिळणार आहे. पाचव्यावेळेस जेंव्हा कक्षा वाढवली जाईल त्यावेळी यान चंद्राजवळ पोहचणार आहे. यानंतर, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करुन चंद्रावर पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याला जवळपास ५१ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यानंतर, आपण सुरक्षितरित्या चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत.

चांद्रयान-१ पेक्षा चांद्रयान-२ महत्वाकांक्षी

चांद्रयान-१ मध्ये आपल्याला फक्त चंद्रावर पोहचायचे होते. चांद्रयान-१ मध्ये एकूण ११ प्रयोग करण्यात आले. यामध्ये ५ प्रयोग भारताकडून करण्यात आले. तर, बाकीचे ६ प्रयोग नासा, युरोपिअन स्पेस एजन्सी आणि इतर लहान देशांसाठी करण्यात आले. परंतु, चांद्रयान-२ मध्ये फक्त भारतासाठी १३ प्रयोग करण्यात येणार आहेत. तर, नासासाठीही १ प्रयोग करण्यात येणार आहे. चांद्रयान-१ पेक्षा चांद्रयान-२ ५० ते १०० पटीने अत्याधुनिक आहे. चांद्रयान-२ मध्ये सगळ्यात मोठा अडथळा हा सॉफ्ट लँडिगसाठी येणार आहे. चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. दिवसा चंद्रावर १२० ते १३० अंश तापमान असणार आहे. तर, रात्री वजा १२० ते १३० तापमान असणार आहे. येथे तापमान पृथ्वीच्या एकदम भिन्न आहे. चंद्रावर उतरणाऱ्या रोव्हरला फक्त दिवसा काम करता येणार आहे. तर, रात्री रोव्हर येथे काहीही काम करता येणार नाही.

उलट इस्रोच नासाला मदत करणार

नासाकडून आपल्या कोणतीही सहाय्यता मिळाली नाही. उलट, चांद्रयान-२ च्या माध्यमातून इस्रो नासाला पहिल्यांदा मदत करणार आहे. चांद्रयान-२ योजनेतून भारताचे नाव उज्वल होणार आहे. चाद्रयान-२ च्या माध्यमातून करण्यात येणारे प्रयोग हे अत्याधुनिक स्वरुपाचे असणार आहेत. इस्रोने या प्रयोगाची यशस्वीरित्या चाचणी घेतली आहे. चांद्रयान-२ च्या माध्यमातून इस्रो आणि भारताचे नाव मोठे होणार आहे, यासाठी भारत आणि इस्रोला खूप खूप शुभेच्छा असेही अहमद म्हणाले.

Intro:Body:

better to use before launching.

Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 3:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.