ETV Bharat / bharat

विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क करण्याचे प्रयत्न इस्रो सुरूच ठेवणार

संपर्क साधण्याचा अँटिना कुठल्या दिशेला आहे ते ही ठाऊक नाही. तसेच, चंद्रावर रात्रीच्या थंड वातावरणात ही उपकरणे तग धरण्याची शक्यता कमी आहे. इतक्या दिवसांनी संपर्क होणे कठीण आहे. पण प्रयत्न करण्यात काही चुकीचे नाही, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इस्रो
author img

By

Published : Oct 1, 2019, 11:47 PM IST

बंगळुरु - इस्रोच्या वैज्ञानिकांनी विक्रम लँडरशी संपर्काची आशा सोडलेली नाही. चंद्रावर हार्डलँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. यानंतर सतत १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो असफल ठरला. आता इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजूनही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे संकेत मंगळवारी दिले.

7 सप्टेंबरला अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. आता चंद्रावर रात्र असल्यामुळे विक्रमशी संपर्क करणे शक्य नाही. दिवस सुरु झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न करु शकतो. लँडिग साईटच्या जागी आता रात्र आहे. तिथे सूर्यप्रकाश नाही असे इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी सांगितले. विक्रम लँडर आणि त्यातल्या प्रग्यान रोव्हरची रचना चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.

हेही वाचा - गांधीजी @ १५०: ईटीव्ही भारतने लॉंच केलेल्या विशेष गीताचे पियूष गोयल,व्यंकय्या नायडूंकडून कौतुक

संपर्क साधण्याचा अँटिना कुठल्या दिशेला आहे ते ही ठाऊक नाही. तसेच, चंद्रावर रात्रीच्या थंड वातावरणात ही उपकरणे तग धरण्याची शक्यता कमी आहे. इतक्या दिवसांनी संपर्क होणे कठीण आहे. पण प्रयत्न करण्यात काही चुकीचे नाही, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ठरवलेल्या वेगापेक्षा जास्तवेगात लँडर चंद्रावर उतरला होता. त्यामुळे आतमधल्या उपकरणांचे नुकसान झालेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लँडरशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता खूप धूसर आहे.

नासाच्या ऑर्बिटरलाही विक्रम लँडरचे फोटो मिळवता आले नव्हते. ज्या वेळी ऑर्बिटर तिथून गेला तेव्हा संधीप्रकाश होता. त्यामुळे सावल्यांखाली लँडर झाकला गेल्याची शक्यता आहे. आता १४ ऑक्टोंबरला नासाचा ऑर्बिटर तिथून पुन्हा जाणार आहे. त्यावेळी लख्ख प्रकाश असल्यामुळे विक्रमचे फोटो मिळण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - 3 पाकिस्तानी हिंदू शरणार्थी मुलांना शाळेत प्रवेश नाही, उच्च न्यायालयात घेतली धाव

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.