ETV Bharat / bharat

मनोहर पर्रीकरांचे निधन: केंद्राकडून एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर - गोवा मुख्यमंत्री

राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्याने सोमवारी केंद्र व राज्य सरकारचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोबतच या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

मनोहर पर्रीकर
author img

By

Published : Mar 17, 2019, 10:09 PM IST

नवी दिल्ली - गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात एका दिवसाचा (१८ मार्च) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्याने सोमवारी केंद्र व राज्य सरकारचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोबतच या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. पर्रीकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते गोव्याचे मुख्यमंत्री हा प्रवास मोठा आहे. केंद्रातील संरक्षण मंत्रालयाचा पदभारही पर्रीकर यांना काही काळ सांभाळला. यानंतर त्यांना पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गोव्यात पाठविण्यात आले होते.

मान्यवरांकडून श्रद्धांजली -

राष्ट्रपती राजनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ट्विट करून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.