कोलकाता - अम्फान चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाचे पथक गुरुवारी सायंकाळी पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. ही माहितीती राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गृह मंत्रालयाचे सहसचिव अनुज शर्मा (सायबर आणि माहिती सुरक्षा) यांच्या अध्यक्षतेखाली हे सात सदस्यीय पथक उत्तर आणि दक्षिण 24 परगना दोन सर्वात बाधित जिल्ह्यांचा सर्व्हे करणार आहे. सर्व्हेच्या माध्यमातून नुकसानाचे आकलन केले जाईल, असे शर्मा यांनी सांगितले.
सर्वेक्षण करण्यासाठी संघातील सदस्यांचे दोन गटात विभागले जाईल. आयएमसीटीचे सदस्य दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील पाथप्रतीमा आणि नामखाना आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज आणि बशीरहाट येथील सर्वेक्षण करतील.
चक्रीवादळ अम्फानमुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भातील अहवाल राज्य सरकारने तयार केला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.