ETV Bharat / bharat

विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व दिसून येत आहे, विरोधी पक्ष समोर दिसतच नाही. काँग्रेस राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये गुंतला आहे,असे पियूष गोयल म्हणाले.

author img

By

Published : Oct 21, 2019, 9:55 AM IST

Updated : Oct 21, 2019, 11:05 AM IST

पियूष गोयल

मुंबई - विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व दिसून येत आहे, विरोधी पक्ष समोर दिसतच नाही. काँग्रेस राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये गुंतला आहे. महाराष्ट्राची जनता चांगल्या पक्षाच्या प्रतिक्षेत होती. देशाची दशा आणि दिशा सुधारायला भारतीय जनता पक्षाला लोकांनी सत्तेमध्ये निवडून दिले, असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल म्हणाले. मुंबईमध्ये मतदान करायला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला

काँग्रेसने राज्यामध्ये ७८ हजार करोड रुपये खर्च करुन १ एकर जागेवर सुद्धा पाणी पोहचवले नाही. सिंचन घोटाळे केले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेची काम केले, धरणांतील गाळ काढला, तेही कमी खर्चामध्ये, असे ते म्हणाले. मात्र, पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर प्रश्न विचारला असता, रेल्वेमंत्र्यांनी काढता पाय घेतला.

काश्मीरमध्ये ३७० काढल्यामुळे देशभराला आनंद झाला. ७० वर्षांपासून भारतीय जनता या क्षणाची वाट पाहत होती. विरोधी पक्षामध्ये काश्मीरबाबत निर्णय घेण्याची हिंम्मत नव्हती. काँग्रेस आघाडीमुळे निर्णय घेण्यास अडचण येत असल्याचे खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मान्य केले. तसेच ३७० कलमाला काँग्रेसचा विरोध नसल्याचेही सिंग यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मान्य केल्याचे ते म्हणाले.

Last Updated : Oct 21, 2019, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.