ETV Bharat / bharat

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना दिलासा... सीबीएसईनं 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात केली कपात

author img

By

Published : Jul 7, 2020, 8:01 PM IST

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांवरील 30 टक्के अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याचा सल्ला सीबीएसई मंडळाला देण्यात आला, असे पोखरियाल यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च महिन्यापासून सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका असल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(सीबीएसई) 10 वी 12 वीच्या परिक्षाही रद्द केल्या आहेत. आता कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये 9 वी ते 12 वी च्या 30 टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल यांनी आज(मंगळवारी) ही माहिती दिली.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांवरील 30 टक्के अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याचा सल्ला सीबीएसई मंडळाला देण्यात आला, असे पोखरियाल यांनी सांगितले.

अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यास मदत होण्यासाठी आम्ही देशातल्या शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सुचना मागविल्या होत्या. आम्हाला दीड हजारांपेक्षा जास्त सुचना मिळाल्या, याचा आनंद झाला. प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, असे ट्विट पोखरियाल यांनी केले.

शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेवून अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग तसाच ठेवून इतर 30 टक्के भाग रद्द करण्यात आला आहे. मुळ संकल्पना तशाच ठेवण्यात आल्या आहेत, असे पोखरियाल म्हणाले.

16 मार्चपासून देशातली शाळा, महाविद्यालये बंद आहेत. काही शाळा महाविद्यालयांनी ऑनलाईन परीक्षा घेतल्या. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि इतर सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, ही मोठी अडचण आहे. लॉकडाऊनची बंधणे शिथिल करण्यात आली. मात्र, शाळा महाविद्यालये सुरु करण्यात आली नाही. विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानेही तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सप्टेंबर महिन्याच्या शेवटी परिक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.