नवी दिल्ली/नोएडा - नोएडा आणि गुरुग्राममध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी 13 ठिकाणी छापेमारी केली. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल 2 लाख शस्त्र परवाने जारी केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई सुरू आहे. या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यरीत्या जम्मू-काश्मीरबाहेरील लोकांना शस्त्र परवाने दिल्याचा आरोप आहे.
हेही वाचा - प्रत्यक्ष रोगापेक्षा करू वैद्यकीय खर्चावर उपाय...
अनेक ठिकाणी छापेमारी
या गैरप्रकारात अनेक अधिकारी गुंतलेले आहेत. सीबीआय या प्रकरणी चौकशी करत आहे. सीबीआयने सोमवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, जम्मू, कुपवाडा, बारामुल्ला, उधमपूर, किश्तवाड, शोपियान, राजौरी, डोडा, पुलवामासह नोएडा आणि हरियाणातील गुडगावमधील 13 ठिकाणी छापेमारी केली. या अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरचे रहिवासी नसलेल्या अनेकांना नियमबाह्यारीत्या शस्त्र परवाने दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या अधिकाऱ्यांवर कारवाई
सीबीआयने 2010 च्या बॅचमधील आयएएस आणि कुपवाडाचे माजी जिल्हाधिकारी राजीव रंजन, 2007 चे आयएएस आणि बारामुल्ला, उधमपूरचे माजी जिल्हा न्याय दंडाधिकारी यशा मुदगिल, कुपवाडाचे माजी जिल्हाधिकारी इटारत हुसैन, किश्तवाडचे माजी न्याय दंडाधिकारी सलीम मोहम्मद, मोहम्मद जावेद खान, राजौरीचे माजी न्याय दंडाधिकारी एस. सी. भगत, डोडाचे न्याय दंडाधिकारी फारूक अहमद खान आणि पुलवामाचे माजी न्याय दंदाधिकारी जहांगीर अहमद मीर यांच्या निवासस्थानांवर छापेमारी करण्यात आली आहे.
हेही वाचा - भारतात प्रदूषणाचे सर्वाधिक बळी..!