ETV Bharat / bharat

केरळच्या मुख्यमंत्र्यांबद्दल समाजमाध्यमांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल - kerala

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल एका पत्रकारास अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने योगींना फटकारले असून त्या पत्रकाराला तत्काळ सोडण्याचे आदेश दिले होते.

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन
author img

By

Published : Jun 13, 2019, 11:13 AM IST

Updated : Jun 13, 2019, 1:44 PM IST

तिरुवनंतरपुरम - केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याबद्दल समाज माध्यमांवर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या ११९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. विजयन यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात वादग्रस्त मजकूर लिहणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधी केरळच्या गृहविभागाने आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे.

केरळ विधानसभेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत ११९ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १२ राज्य सरकराचे तर एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. इंडियन युनियन मुस्लीम लीगचे नेते एम. के. मुनीर यांनी जानेवारी २०१९ मध्ये यासंबंधी विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देत केरळ गृहविभागाने ही माहिती प्रकाशित केली आहे. एकून ११९ जणांवर मुख्यमंत्री विजयन यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गेल्या ३ वर्षांपासून करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल एका पत्रकारास अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने योगींना फटकारले असून त्या पत्रकाराला तत्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हा मुद्दा चागंलाच चर्चेत होता. मात्र, आता केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यावर टीका करणाऱ्या तब्बल १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Intro:Body:

Nat 02

Conclusion:
Last Updated : Jun 13, 2019, 1:44 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.