नवी दिल्ली - आजपासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा आज संसदेमध्ये उपस्थित केल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला असून दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
संसदेमध्ये विरोधकांनी दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. संसदेमध्ये शाह यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गदारोळ निर्माण झाल्यानंतर मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांवर टीका केली. १९८४ मध्ये जेव्हा ३ हजार लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा ज्या लोकांनी काही कारवाई केली नाही. तीच लोक आज संसदेत गदारोळ निर्माण करत आहेत. मी याचा निषेध करतो, असे ते म्हणाले.
आपले मत मांडताना शांतता आणि सद्भावना कायम राहील याची काळजी घ्यायाला हवी. जेव्हा स्थिती सामान्य होईल, तेव्हा कामकाज सुरु करु , असे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला म्हणाले. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारविरोधात डोळ्यावर काळ्या फीती बांधून निषेध दर्शवला.