नवी दिल्ली - भारत-चीन सीमावादावरुन सध्या देशात वातावरण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वोसर्वा मायावती यांनी चीनविषयक भाजपाच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे. तसेच काँग्रेस आणि भाजपच्या लढाईत जनहिताचे मुद्दे दाबले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
भारत-चीन सीमाप्रश्नावर बहुजन समाज पक्ष भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे आहे. भारत-चीन सीमाप्रश्नावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून भाजप आणि काँग्रेसकडून केलेले राजकारण देशाच्या हिताचे नाही. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे मायावतींनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
बहुजना समाज पक्षाचा जन्म काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे झाला. काँग्रेस आपल्या धोरणांसह सत्तेतून गेली. भाजपने काँग्रेसकडून धडा घ्यावा. कधी काँग्रेस म्हणतात की, बसपा हा भाजपाच्या हातातील एक खेळण आहे. तर कधी भाजप म्हणतो की, बसपा हा काँग्रेसच्या हातातील खेळण आहे. हे दोन्ही पक्ष राजकारण करीत आहेत. मात्र, बसपा देशहितासाठी काम करणार्यांसोबत आम्ही आहे. मागासवर्गीय लोक, आदिवासी आणि धर्मांतरित अल्पसंख्यांकांच्या हितासाठी काम करण्यासाठी बसपाची स्थापना केली गेली, असे त्या म्हणाल्या.
कोरोना आणि आर्थिक अडचणींमुळे सध्या लोक त्रस्त आहेत. दुसरीकडे, सरीकडे सातत्याने इंधनाच्या किंमतीत वाढ होत आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लवकरात लवकर देशातील इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी मायावती यांनी केली आहे.