ETV Bharat / bharat

गेट खोलण्यावरून वाद.. बीएसएफ जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करून केली  आत्महत्या - बीएसएफ गोळीबार

दोघांमध्ये झालेल्या वादानंतर जवानाने अधिकाऱ्याची गोळी मारून हत्या केली, त्यानंतर स्वत:लाही गोळी मारून घेत आत्महत्या केली.

bsf
बीएसएफ जवानाची आत्महत्या
author img

By

Published : May 3, 2020, 1:23 PM IST

जयपूर - राजस्थानातील भारत-पाक सीमेजवळ तैनात असलेल्या एका सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करून आत्महत्या केली. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर जवानाने अधिकाऱ्याची गोळी मारून हत्या केली, त्यानंतर स्वत:लाही गोळी मारून घेत आत्महत्या केली.

वरिष्ठासोबत झालेल्या भांडणाचे रुपांतर गोळीबारात

ही घटना श्रीगंगानगर येथील रेणुका पोस्टवर आज सकाळी साडेसहा वाजता घडली. हवालदार शिवचंद्र राम १२५ व्या बटालयिनमध्ये कार्यरत होते. ड्यूटीवर असताना वरिष्ठ अधिकारी रनवेंद्र पाल सिंह तेथे आले होते, त्यांनी शिवचंद्रला गेट खोलण्यास सांगितले. मात्र, गेट खोलण्यास उशिर झाला. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे चिडलेल्या शिवचंद्र यांनी रनवेंद्र यांना गोळी झाडली. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला गोळी मारत आत्महत्या केली.

वरिष्ठ अधिकारी उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील रहिवासी होते. तर हवालदार शिवचंद्रन हजारीबाग झारखंड येथील होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठविले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.