ETV Bharat / bharat

प्रेमी युगुलांनी 'ड्राईव्ह-इन' चित्रपटगृहात साजरा केला ब्राझिलियन व्हॅलेंटाईन डे

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. ब्राझीलियन लोक मात्र, 12 जूनला व्हॅलेंटाईन डे साजरा करुन प्रेम व्यक्त करतात. ड्राईव्ह-इन चित्रपटगृहात चित्रपट पाहून रिओच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये अनेक झोडप्यांनी 'ब्राझीलियन व्हॅलेंटाईन डे' साजरा केला.

author img

By

Published : Jun 14, 2020, 3:45 PM IST

Arena Jeunesse
अरेना ज्युनेस

रिओ दि जनैरो - ड्राईव्ह-इन चित्रपटगृहात चित्रपट पाहून रिओच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये अनेक झोडप्यांनी 'ब्राझीलियन व्हॅलेंटाईन डे' साजरा केला. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. ब्राझीलियन लोक मात्र, 12 जूनला व्हॅलेंटाईन डे साजरा करुन प्रेम व्यक्त करतात.

या वर्षी कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वच बंद असल्याने रेस्टॉरंट्समधील रोमँटिक डिनर, कॉन्सर्टस् मध्ये भाग घेणे किंवा नाट्यगृहातील नाटक पाहण्याची संधी प्रेमी जोडप्यांना मिळाली नाही.

प्रेमी युगुलांनी ड्राईव्ह-इन सिनेमात साजरा केला ब्राझिलियन व्हॅलेंटाईन डे

प्रेमी जोडप्यांची अडचण लक्षात घेऊन रिओ दि जनैरोमधील एका कंपनीने ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केलेल्या जागी एका 'लव्ह सिने ड्राईव्ह इन' चित्रपट गृहाची निर्मिती केली. मॉस्कोमध्ये सर्व प्रथम असे ड्राईव्ह-इन चित्रपटगृह सुरू झाले होते.

ब्राझीलमधील या ड्राईव्ह-इन चित्रपटगृहात 650 इंचाच्या स्क्रीनसमोर अंतर ठेवून 180 गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. आपण बुक केलेल्या गाडीमध्ये बसून आरामात चित्रपटाचा आनंद घेता येतो. याठिकाणी ऑनलाईन जेवण, पेये आणि पॉपकॉर्नही ऑर्डर करू शकता. ड्राईव्ह-इन सिनेमा 10 जून रोजी सुरू झाले असून 19 जुलैपर्यंत खुले राहील. एका कारचे भाडे 20 डॉलर्स इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.