मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करण्यास बिहारवरून मुंबईत आलेल्या विनय तिवारी या आयपीएस अधिकाऱ्यास क्वारंटाईमधून सोडण्यास बृहन्मुंबई महानगर पालिकेने नकार दिला आहे. विनय तिवारी यांच्या सुटकेसाठी पटना पोलीस महानिरिक्षकांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहले होते. या पत्राला महापालिकेने उत्तर दिले आहे. बीएमसीने तिवारी यांच्या सुटकेस नकार दिल्याचा निर्णय दुर्देवी असल्याचे पोलीस महासंचालक पांडे यांनी म्हटले आहे.
पटना पोलीस महानिरिक्षकांनी मुंबई महानगर पालिकेच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. विनय तिवारी यांना क्वारंटाईन असल्याचा विरोध करत सोडण्याची विनंती केली होती. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली आहे. बीएमसीने पाटणा पोलिसांना उत्तर पाठविले आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक विनय तिवारी 14 दिवस कोंडले गेले आहेत. बीएमसीचा निर्णय दुर्देवी असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.
अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस महासंचालकांनी विनय तिवारी या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मात्र, तपासासाठी तिवारी मुंबईला आले असता त्यांना महानगरपालिकेने 14 दिवस क्वारंटाईन केले. मुंबई पोलीस सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात सहकार्य करत नसून बिहार पोलीस महासंचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई पोलिसांनी क्वारंटाईनच्या नावाखाली विनय तिवारी यांना घरात अटक करून ठेवल्याचे ते म्हणाले आहेत.