नवी दिल्ली - ज्या प्रमाणे हिटलरने ज्यूंवर अत्याचार केले, त्या प्रमाणे सरकार आता कोरोना महामारीचा वापर मुस्लिमांच्या नरसंहारासाठी करु इच्छीत असल्याचे अरुंधती रॉय यांनी म्हटले. यावरून भाजप नेते शाहनवाज हुसैन अरुंधती रॉय यांच्यावर टीका केली. रॉय यांनी निंदनीय विधान केले असून त्यांनी देशाची माफी मागावी, असे शाहनवाज हुसैन यांनी म्हटले.
अरुंधती रॉय यांचे विधान केवळ निंदनीयच नाही, तर त्यांनी देशाची माफी मागायला हवी. असे विधान करणे म्हणजे, हिंदू मुस्लीम ऐक्यावरील हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या संकटातून लोकांना मुक्त करण्यासाठी सतत सुधारात्मक पावले उचलत आहे. आशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाबद्दल असे सांगत आहेत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे, असे शाहनवाज हुसेन यांनी म्हटले आहे.
नाझींनी ज्यू लोकांविरूद्ध जे काही केले होते. त्याचप्रमाणे केंद्रातील मोदी सरकार पावले उचलत आहे. मोदी सरकार मुसलमानांच्या विरोधात असून ते त्यांच्याविषयी हुकूमशाही वृत्ती स्वीकारत आहे आणि कोरोनाचा महामारीचा फायदा घेत त्यांना निरोधक केंद्रात पाठवण्यास सुरवात केली आहे, असे अरुंधती रॉय यांनी एका परदेशी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.