श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभुमीवर जम्मूमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय निवडणूक प्रमुख विनोद सोनकर यांच्यासह पक्षाचे माजी मंत्री आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. काश्मीरमधील कोणताही नेता नजरकैदेत नाही, ते स्वत: घराबाहेर येण्याचे टाळत आहेत, असे सोनकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
यावेळी विनोद सोनकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला केली. ३७० कलम काश्मीरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आले होते. कोणीही त्याला हटवण्याची हिंम्मत दाखवली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली अमित शहांनी ३७० कलमाचा कलंक काश्मीरवरून हटवण्याची हिंम्मत केली. त्यामुळे काश्मीरमधील लोकांची या कलमाच्या यातनेतून सुटका झाली आहे.
काश्मीरातील कोणताही नेता नजरकैदेमध्ये नाही. ते स्वत: घराच्या बाहेर निघत नाहीत. काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरक्षेच्या कारणास्तव या आधीही बंद करण्यात आली होती. त्यामुळे आताही ती बंद करण्यात आली आहे. हळूहळू राज्यामधील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यानंतर सर्वकाही ठीक होईल असे, सोनकर म्हणाले.
३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधील स्थिती संवेदनशील बनली आहे. राज्यामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली आहे.