लखनऊ - उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील भाजप नेत्यावर पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यात असणाऱ्या बुधाना गावातील ही घटना आहे.
सर्कल अधिकारी खुशपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील भाजप मंडळ उपाध्यक्ष आशिष जैन यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाच्या महिला मोर्चामधील एका कार्यकर्तीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आशिष जैन यांनी जबरदस्तीने आपल्या घरात घुसून आपला विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे, महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी विरोध केला असता, आपल्याला धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे.
भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४, कलम ५०४, कलम ५०६ आणि कलम ४५२ अंतर्गत जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही खुशपाल यांनी सांगितले.
हेही वाचा : तेलंगणा: पेटवून दिलेल्या 'त्या' तहसिलदार महिलेला वाचवण्यास गेलेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू