नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केल्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर 'राहुल गांधीकडून चांगल्या भाषेची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही', असे भाजप प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले.
![BJP leader Amit Malviya slammed rahul gandhi on detention camp in aasam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5500972_rahul.jpg)
राहुल गांधीच्या टि्वटची भाषा आक्षेपार्ह आहे. त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. राहुल गांधींना खोटे बोलणाऱ्या लोकांचा सरदार म्हटलं तरी ते जास्त होणार नाही, असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.
![BJP leader Amit Malviya slammed rahul gandhi on detention camp in aasam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5500972_thumb.jpg)
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी नेहमी विदेश यात्रा करतात. त्यांनी आपला परवाना संपल्यानंतर तिथे थांबायला हवे आणि पाहायला हवे की, त्यांची ओळख कोणत्या प्रकारे केली जाते आणि मायदेशात पाठवण्यापूर्वी त्यांना कश्या प्रकारे स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) मध्ये ठेवले जाते. तेव्हा त्यांना कळेल की, इतर देश घुसखोरांसोबत कशा पद्धतीने वागतात, असे अमित मालवीय म्हणाले. तसेच मालवीय यांनी आसाम सरकारचे 2011 चे परिपत्रक जारी केले. त्यामध्ये 362 घुसखोरांना तीन डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेत बोलताना कुठेही स्थानबद्धता छावणी उभारली जात नसल्याचे म्हटले होते. त्यावर राहुल गांधी यांनी आसाम येथील गोलपाडा येथे सर्वात मोठी स्थानबद्धता छावणी निर्माण केली जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि मोदींना खोटारडे म्हटले आहे.