नवी दिल्ली - भाजपचे मुख्य सचिव राम माधव यांनी मंगळवारी भाजप आसाममध्ये आसाम गण परिषदेसह (एजीपी) लोकसभेसाठी युती करणार असल्याचे सांगितले. बोडोलँड पीपल्स फ्रंटही (बीपीएफ) या युतीमध्ये असणार आहेत. आसामधील १४ मतसंघांमध्ये उमेदवार लोकसभा निवढणूक लढवणार आहेत. ११ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत ३ टप्प्यांत येथील निवडणुका होणार आहेत.
जानेवारीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा २०१६ संदर्भात मतभेद झाल्याने आसाम गण परिषदेने (एजीपी) भाजपसोबतची युती तोडली होती. एजीपी, बीपीएफ आणि भाजपने २०१६ मध्ये आसाममधील विधानसभा निवडणुकांसाठी युती केली होती. येथे २००१ पासून सलग ३ कार्यकालांमध्ये काँग्रेसशिवाय सरकार स्थापन करण्यात आले होते.
निवडणूक आयोगाने २०१९ लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. ११ एप्रिलपासून १९ मेपर्यंत निवडणुका होणार आहेत. २३ मे ला मतमोजणी होईल.