नवी दिल्ली - शहरातील शेल्टर होममध्ये एका स्थलांतरीत कामगाराच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. नवी दिल्ली डीएम ऑफिसच्या टीमने लहान मुलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्संही पाळण्यात आला.
नवी दिल्ली डीएम ऑफिसच्या टीमला शेल्टर होमधील मुलाचा वाढदिवस असल्याचे कळाले. तेव्हा टीमने मुलासाठी केक आणला आणि त्याला भेटवस्तूही दिली. केक कापल्यावर शेल्टर होमधील महिलांनी डान्स केला, तर जिल्हा कार्यालयातून आलेल्या अनेक कलाकारांनीही आपली कला सादर केली.
नवी दिल्ली जिल्हा प्रशासन शेल्टर होममध्ये राहणाऱया लोकांसाठी 'मनोरत्नम' नावाचा एक हॅप्पीनेस क्लास चालवत आहे. जेणेकरुन, हे लोक कोणत्याही मानसिक तणावाशिवाय इथे राहू शकतील. म्हणून, याचाच भाग म्हणून वाढदिवस साजरा करण्यात आला. माहितीनुसार यापूर्वी कधीच मुलाचा वाढदिवस साजरा झाला नव्हता.
देशात कोरोनाबाधिताचे प्रमाण वाढतच चालले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरी कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्लीमधील काही स्थलांतरीत कामगार शेल्टर होममध्ये राहत आहेत.