ETV Bharat / bharat

'कोरोना संकटकाळात who चा निधी रोखणे धोकादायक'

'जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेला दिलेला निधी थांबवणे धोकादायक आहे. संघटना कोरोनाचा प्रसार कमी करत आहे. जर हे काम थांबले तर त्यांची जागा कोणतीही इतर संस्था घेऊ शकत नाही. या संस्थेची पूर्वी कधीच नव्हती तेवढी गरज आज आहे', असे बिल गेट्स यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

author img

By

Published : Apr 16, 2020, 2:56 PM IST

वॉशिंग्टन डीसी - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणारा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला. यावरून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

'जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेला दिलेला निधी थांबवणे धोकादायक आहे. संघटना कोरोनाचा प्रसार कमी करत आहे. जर हे काम थांबले तर त्यांची जागा कोणतीही इतर संस्था घेऊ शकत नाही. या संस्थेची पूर्वी कधीच नव्हती तेवढी गरज आज आहे', असे बिल गेट्स यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • Halting funding for the World Health Organization during a world health crisis is as dangerous as it sounds. Their work is slowing the spread of COVID-19 and if that work is stopped no other organization can replace them. The world needs @WHO now more than ever.

    — Bill Gates (@BillGates) April 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश दिले असल्याचे ट्रम्प यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल अशी भूमिका घेतली आणि कोरोनाप्रसाराबाबत तथ्य लपवले, असा आरोप ट्रम्प यांनी संघटनेवर केला आहे.

कोरोनाच्या प्रसाराबद्दलची माहिती लपवणे आणि गैरव्यवस्थापन याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची समिक्षा करण्यात येत आहे. समिक्षा पूर्ण होईपर्यंत अमेरिका संघटनेला निधी पुरवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.