नवी दिल्ली - येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात असलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात एका व्यक्तीने उडी मारली. त्यानंतर, संग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत या व्यक्तीचा जीव वाचवला. गुरुवारी दुपारी १२.३०च्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीचे नाव रेहान खान आहे, तो मूळचा बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहे. प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढत, पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
रेहान याने पिंजऱ्यात उडी घेतली, आणि 'मी इथे मरण्यासाठी आलो आहे, मला वाचवू नका' असे ओरडू लागला. त्यानंतर, आम्ही त्याला वाचवण्यासाठी शिडी देखील दिली, मात्र त्याने वर येण्यास नकार दिला. मग आम्ही सिंहाला झोपेचे इंजेक्शन मारून शांत केले, आणि रेहानला बाहेर काढले. अशी माहिती राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे जनसंपर्क अधिकारी रियाज अहमद खान यांनी दिली.
-
Riyaz Ahmed Khan,PRO,National Zoological Park, Delhi: Rehan Khan jumped into lion's enclosure,guards tried to stop him.He kept saying,'I've come to die,don't rescue me.' We all rushed to the spot,gave him a ladder but he did not listen. Then we tranquilised the lion & rescued him https://t.co/4LnjtPI4AA pic.twitter.com/4IQMdyHN0P
— ANI (@ANI) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Riyaz Ahmed Khan,PRO,National Zoological Park, Delhi: Rehan Khan jumped into lion's enclosure,guards tried to stop him.He kept saying,'I've come to die,don't rescue me.' We all rushed to the spot,gave him a ladder but he did not listen. Then we tranquilised the lion & rescued him https://t.co/4LnjtPI4AA pic.twitter.com/4IQMdyHN0P
— ANI (@ANI) October 17, 2019Riyaz Ahmed Khan,PRO,National Zoological Park, Delhi: Rehan Khan jumped into lion's enclosure,guards tried to stop him.He kept saying,'I've come to die,don't rescue me.' We all rushed to the spot,gave him a ladder but he did not listen. Then we tranquilised the lion & rescued him https://t.co/4LnjtPI4AA pic.twitter.com/4IQMdyHN0P
— ANI (@ANI) October 17, 2019
हेही वाचा : मेक्सिकोमधून अवैधरीत्या अमेरिकेत घुसण्याच्या प्रयत्नातील ३११ भारतीयांची स्वगृही रवानगी