ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : पहिल्याच सभेत मोदींचा विरोधकांवर घणाघात, नितीश कुमारांवर स्तुतीसुमने - बिहार निवडणूक लेटेस्ट न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या सासाराममध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांवर निशाणा साधला. तर मुख्यमंत्री नितिश कुमार यांचे कौतुक केले. तसेच सुरवातीला त्यांनी रामविलास पासवान आणि बाबू रघुवंश प्रसाद सिंह यांना आदरांजली वाहिली.

मोदी
मोदी
author img

By

Published : Oct 23, 2020, 1:43 PM IST

पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या सासाराममध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. सासाराममध्ये मोदींनी आपल्या भाषणाची सुरवात भोजपुरी भाषेतून केली. यावेळी मोदींनी राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांवर निशाणा साधला. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले. तसेच सुरवातीला त्यांनी रामविलास पासवान आणि बाबू रघुवंश प्रसाद सिंह यांना आदरांजली वाहिली.

स्वार्थाचे राजकारण

जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज काही लोक 370 अनुच्छेद पुन्हा लागू करण्याचे म्हणत आहेत. या लोकांनी फक्त स्वार्थाचे राजकारण केले आहे, असे मोदी म्हणाले. तसेच नितीश कुमार यांनी कोरोनाचा प्रसार रोखला आहे. बिहारमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार झाला असता. तर राज्यात हाहाकार माजला असता, असे मोदी म्हणाले.

पुन्हा एनडीएचीच सत्ता

बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार सत्तेत येणार असल्याचे पोलमधून पाहायला मिळत आहे. बिहारमधील शूर सुपुत्रांनी गलवाण खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिलं. तसेच पुलवामा हल्ल्यातही बिहारचे सुपुत्र हुतात्मा झाले. त्या सर्वांना माझे नमन, असे पंतप्रधान म्हणाले. बिहारला डबल इंजिनची शक्ती मिळाली आहे. राज्याचा विकास झाला आहे. बिहारच्या विकासासाठी पुन्हा एकदा नितिश कुमार यांना मतदान करा, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.

बिहारचा होतोय कायापालट

बिहारमधील ग्रामीण भागात वीज पोहचली असून रस्ते बनले आहेत. नद्यांवर पूल होत आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिला, गरीब आणि दुकानदारांना मदत करण्यात येत आहे. देशाच्या शिक्षणव्यवस्थेमध्ये बिहारचा गौरवशाली इतिहास राहिला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून प्रेरणा घेत, वैद्यकीय, अभियांत्रिकी यासारखे कोर्सेस मातृभाषेत शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार निवडणुकीत एकूण 12 सभा घेणार आहेत. 243 विधानसभा जागा असणार्‍या बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल. निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.